21 April 2019

News Flash

विराट तू आम्हाला देश सोडायला सांगू शकत नाहीस! युझर्सकडून कोहली ट्रोल

काही कारण असो वा नसो, भारताचा कर्णधार विराट कोहली नेहमीच चर्चेत असतो. सध्या एका व्हिडिओमुळे विराट कोहली वादात सापडला आहे.

विराट कोहली

काही कारण असो वा नसो, भारताचा कर्णधार विराट कोहली नेहमीच चर्चेत असतो. सध्या एका व्हिडिओमुळे विराट कोहली वादात सापडला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. विराट कोहलीने त्याच्या अधिकृत अॅपच्या प्रमोशनसाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. विराटच्या ३० व्या वाढदिवसाच्यादिवशी सोमवारी हे अॅप लाँन्च झाले.

अवश्य वाचा : लग्नानंतरची अशी आहे ‘विरुष्का’ची पहिली दिवाळी

या व्हिडिओमध्ये विराट इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आवडतात असे मत नोंदवणाऱ्या एका चाहत्याला सुनावताना दिसत आहे. भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोड आणि दुसऱ्या देशात जाऊन राहा, असा सणसणीत टोला कोहलीने एका चाहत्याला लगावला आहे.

कोहलीचे हे उत्तर अनेकांना पटलेले नसून त्याला टि्वटरवर ट्रोल केले जात आहे. आम्हाला आमच्या पसंतीच्या क्रिकेटपटूंवर प्रेम करण्याचा अधिकार नाही का ? आम्ही भारतात रहातो म्हणून दुसऱ्या देशांचा तिरस्कार करावा असे होत नाही असे एका युझरने सुनावले आहे. विराट तू आम्हाला देश सोडून जायला सांगू शकत नाहीस असे एका चाहत्याने सुनावले आहे.

First Published on November 7, 2018 7:07 pm

Web Title: virat kohli trolled for asking fans to leave india