News Flash

इंस्टाग्रामवर विराटचा स्ट्रेट ड्राइव्ह, ईशांत शर्माला ट्रोल करताना म्हणाला….

ईशांत शर्माने पोस्ट केलेल्या फोटोवर विराटची भन्नाट कमेंट

Virat Kohli trolls Ishant Sharma

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे. नाही मैदानावरील कामगिरीसाठी नाही तर इंस्टाग्रामवरील एका पोस्टमुळे ईशांत चर्चेत आला आहे. सध्या एकदिवसीय सामने आणि टी-२० संघामधून वगळण्यात आलेल्या ईशांतला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्रोल केलं आहे.

झालं काय?

ईशांत शर्मा सध्या मैदानावर घाम गाळताना दिसत नसला तरी सोशल नेटवर्किंगवर तो प्रचंड अॅक्टीव्ह आहे. ईशांतने इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना, “आपण फक्त एकदाच जगतो,” असं म्हटलं होतं. मात्र त्याच्या याच कॅप्शनवरुन त्याला विराट कोहलीने ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

you only live once 

A post shared by Ishant Sharma (@ishant.sharma29) on

काय म्हणाला कोहली

“आपण फक्त एकदाच जगतो,” या ईशांतच्या कॅप्शनवरुनच विराटने मजेदार टोला लगावला. “आम्हाला तर माहितचं नव्हतं,” असं विराटने या पोस्टवर कमेंट करुन म्हटलं आहे. विराटच्या या कमेंटनंतर अनेकांनी ईशांतची मस्करी केली आहे.

न्यूझिलंडच्या कसोटी दौऱ्यासाठी ईशांतची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान वेलिंग्टनमध्ये तर दुसरा सामना २९ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान क्राइस्टचर्चेच्या मैदानात होणार आहे. या न्यूझिलंड मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली. २४ जानेवारीपासून भारत आणि न्यूझिलंडमध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवला जाणार आहे.

असा असेल न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 10:10 am

Web Title: virat kohli trolls ishant sharma on instagram scsg 91
Next Stories
1 “BCCI, जरा लाज वाटू द्या”; संजू सॅमसनला वगळल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संताप
2 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्र अग्रस्थानी कायम
3 हर्नाडेझ बार्सिलोनाचा मुख्य प्रशिक्षक?
Just Now!
X