09 April 2020

News Flash

बचावात्मक पवित्र्यातून बाहेर या, विराटचा भारतीय फलंदाजांना सल्ला

पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाज अपयशी

वेलिंग्टन कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने १० गडी राखत भारतावर मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे यांचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या सामन्यात बाजी मारण भारतीय संघासाठी महत्वाचं बनलं आहे. या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

अवश्य वाचा – वेलिंग्टन कसोटी पराभवानंतर संघाच्या निवडीवर कपिल देव यांचं प्रश्नचिन्ह

“माझ्या मते आमच्या फलंदाजीतली देहबोली सुधारण्याची गरज आहे. बचावात्मक पवित्रा घेतल्यामुळे तुम्हाला धावा करता येतील असं मला वाटत नाही. जर तुमच्याकडून एकेरी-दुहेरी धावाही येत नसतील तर अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःवरच शंका घ्यायला लागता. याचसोबत तुमच्या साथीदारावरही धावा होत नसल्यामुळे दडपण येतं, ज्यामुळे एखादा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विकेट फेकली जाते. या बतावात्मक पवित्र्यामधून फलंदाजांनी आता बाहेर यायला हवं”, दुसऱ्या कसोटी सामन्याआधी विराट पत्रकारांशी बोलत होता.

पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरला. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात ८१ चेंडू खर्च करत केवळ ११ धावा केल्या. मधल्या फळीत हनुमा विहारीने ७९ चेंडू करत १५ धावा केल्या. भारतीय फलंदाजांच्या या पवित्र्याबद्दल विराटने आपली नाराजी व्यक्त केली. २९ फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ख्राईस्टचर्चच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 3:20 pm

Web Title: virat kohli wants batsmen to get rid of ultra defensive approach before second test psd 91
Next Stories
1 वेलिंग्टन कसोटी पराभवानंतर संघाच्या निवडीवर कपिल देव यांचं प्रश्नचिन्ह
2 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा, अनुभवी खेळाडूंना वगळलं
3 मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाक क्रिकेट मालिका शक्य नाही – शाहिद आफ्रिदी
Just Now!
X