News Flash

विराटला बाद करण्याचं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर मोठं आव्हान – मॅथ्यू हेडन

रिचर्डसनकडे भारतात खेळण्याचा अनुभव नाही !

24 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, या दौऱ्यात दोन्ही संघ 2 टी-20 आणि 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळतील. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत विश्रांती घेतलेल्या विराट कोहलीने या मालिकेद्वारे पुनरागमन केलं आहे. सध्या विराट कोहली ज्या पद्धतीने खेळ करतो आहे ते पाहता, त्याला बाद करण्याचं मोठं आव्हान ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर असेल, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने केलं आहे.

“नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात झाय रिचर्डसनविरोधात विराट कोहली काहीवेळा अडचणीत आला. मात्र भारतामध्ये खेळताना परिस्थिती वेगळी असणार आहे. झाय हा तरुण खेळाडू आहे, मात्र भारतामध्ये खेळण्याचा त्याला अनुभव नाही. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या द्वंद्वात विराट बाजी मारेल.” हेडनने आगामी मालिकेसाठी आपली भविष्यवाणी केली.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेन वॉर्नच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला – कुलदीप यादव

याव्यतिरीक्त सलामीवीर रोहित शर्मा आणि जेसन बेहरनडॉर्फ यांच्यातही चांगली लढत रंगेल असा आत्मविश्वास हेडनने व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी आणि वन-डे मालिका जिंकत धडाकेबाज कामगिरी केली होती. विश्वचषकाआधी भारतीय संघाचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे, त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी लोकेश राहुलचं फॉर्मात येणं गरजेचं – एम.एस.के. प्रसाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 11:46 am

Web Title: virat kohli will be dominant against australia says mathew hayden
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 विश्वचषकासाठी लोकेश राहुलचं फॉर्मात येणं गरजेचं – एम.एस.के. प्रसाद
2 Video : आयपीएलसाठी युवराजची कसून तयारी, लगावला Switch Hit षटकार
3 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेन वॉर्नच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला – कुलदीप यादव
Just Now!
X