06 July 2020

News Flash

वन-डे क्रिकेटमध्ये विराट कोहली ७५ ते ८० शतकं ठोकेल !

माजी कसोटीपटू वासिम जाफरचं मत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने आपल्या वन-डे कारकिर्दीतलं ४२ वं शतक झळकावलं. वन-डे क्रिकेटमध्ये सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला अजून ८ शतकं ठोकायची आहेत. मात्र भारताचा माजी कसोटीपटू वासिम जाफरने विराटचा खेळ पाहून एक भविष्यवाणी केली आहे.

विराटने दुसऱ्या वन-डे सामन्यात १२० धावा केल्या, त्याच्या खेळीमुळे वासिम चांगलाच प्रभावित झाला आहे. आगामी काळात वन-डे क्रिकेटमध्ये विराट किमान ७५ ते ८० शतकं ठोकेल असा अंदाज वासिमने व्यक्त केला आहे.

वासिमसोबत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही विराट कोहलीच्या खेळीचं कौतुक केलं आहे. “ज्यादिवशी विराट माझ्या शतकांचा विक्रम मोडेल, त्यादिवशी मी स्वतः त्याच्यासाठी शँपेनची बाटली घेऊन जाईन”, असं सचिन म्हणाला.

अवश्य वाचा – विराटने माझा विक्रम मोडला तर…..सचिनने आखलाय खास प्लान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2019 9:54 am

Web Title: virat kohli will get 75 80 idi hundred predicted by former indian plater wasim jafar psd 91
टॅग Virat Kohli
Next Stories
1 विराटने माझा विक्रम मोडला तर…..सचिनने आखलाय खास प्लान
2 मुख्य प्रशिक्षकपदासाठी शास्त्रींसह सहा उमेदवार शर्यतीत!
3 भारतीय युवा संघाला विजेतेपद
Just Now!
X