News Flash

…म्हणून विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू, माजी दक्षिण आफ्रिकन खेळाडूने केलं कौतुक

विराट जागतिक दर्जाचा खेळाडू !

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल की नाही असा प्रश्न अनेक वेळा क्रिकेट चाहते एकमेकांना विचारत असतात. अनेक आजी-माजी खेळाडूंनी याविषयी आपलं मत नोंदवलं आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक किलसच्या मते, केवळ विराटचं सचिनचा विक्रम मोडू शकले की नाही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो.

“विराट कोहली कारकिर्दीत अजुन खूप लांबचा पल्ला गाठू शकतो. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याच्यात धावांची भूक आहे, त्यासाठी तो अजुनही खडतर मेहनत करतो. त्याला फलंदाजी करत असताना पाहणं प्रेक्षकांना आवडतं. त्यामुळे आगामी काळात विराटने आपली शाररिक तंदुरुस्ती कायम राखली तर तो सचिनचा विक्रम नक्की मोडू शकेल.” कॅलिस एका खासगी कार्यक्रमात बोलत होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेमध्ये घरच्या मैदानावर खेळत असताना भारताला टी-२० आणि वन-डे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाचा भारताच्या विश्वचषक तयारीवर काही परिणाम होणार नाही असंही मत कॅलिसने व्यक्त केलं. विश्वचषकात भारतीय संघावर कोणताही दबाव नसेल असं कॅलिस म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 6:07 pm

Web Title: virat kohlis greatness is in keeping things simple says jacques kallis
Next Stories
1 IPL 2019 : चेन्नई सुपरकिंग्जने राखलं सामाजिक भान
2 IPL 2019 : गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला धक्का, प्रमुख गोलंदाज स्पर्धेबाहेर
3 चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज – मनप्रीत सिंग
Just Now!
X