18 April 2019

News Flash

संगकाराच्या कामगिरीचे शब्दात वर्णन करणे अशक्य- विराट कोहली

कोलंबो कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेल्या श्रीलंकेच्या कुमार संगकारासाठी भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने एक खास संदेश लिहीला.

| August 24, 2015 05:35 am

कोलंबो कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेल्या श्रीलंकेच्या कुमार संगकारासाठी भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने एक खास संदेश लिहीला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संगकाराचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे विराटने म्हटले आहे. संगकाराने क्रिकेटच्या क्षेत्रात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. संगकाराच्या खेळीतून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि या महान फलंदाजाच्या युगात मला खेळण्याची संधी मिळाली यासाठी स्वत:ला नशीबवान समजतो, असे विराटने आपल्या संदेशात म्हटले आहे. संगाकाराचे आभार व्यक्त करीत त्याच्या पुढील आयुष्यासाठी विराटने शुभेच्छा देखील दिल्या. विराटने लिहीलेला संदेश बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.  संगकारासाठी एक सरप्राईज देखील विराटने योजले होते. संगकाराच्या निवृत्तीबद्दल भारतीय संघाकडून लिहीण्यात आलेला संदेश आणि संघातील सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेले टी-शर्ट विराटने आठवण म्हणून संगकाराला भेट दिले.

First Published on August 24, 2015 5:35 am

Web Title: virat kohlis message for kumar sangakkara