कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२० वर्षात नवीन आव्हानासाठी सज्ज झाला आहे. २०१९ वर्षात विश्वचषकातील उपांत्य सामन्यातला पराभव वगळता भारतीय संघाची कामगिरी चांगली झालेली आहे. मात्र आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धांचं जेतेपद पटकावण्यात विराटसेना अपयशी ठरते आहे. यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महत्वाच्या स्पर्धेसाठी विराट कोहलीने आपल्या तरुण सहकाऱ्यांना सल्ला दिला आहे.

“सध्या भारतीय संघाला सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करुन संघाला सामने जिंकवून देईल अशा खेळाडूंची गरज आहे. केवळ दोन-तीन फलंदाजांवर सामना जिंकता येत नाही. अशा पद्धतीने आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धा कधीच जिंकल्या जात नाहीत. त्यामुळे तरुण खेळाडूंकडून सध्या तळातल्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन आक्रमक खेळाची अपेक्षा आहे.” विराट श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्याआधी पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – Video : चाहत्याची अनोखी आयडीया, भेटवस्तू पाहून खुद्द विराटही झाला अवाक

टी-२० विश्वचषकाआधी भारतीय संघाला सराव सामने फार कमी मिळणार आहेत. त्यातच अनेक महत्वाचे प्रश्न संघासमोर आ वासून उभे आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ या सर्व आव्हानांवर मात करत, कशी तयारी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Video : या पंतचं करायचं तरी काय??