News Flash

३६ ऑल आऊट… विराटने रात्री साडेबाराला केलेल मेसेज अन्…

जाणून घ्या मालिका विजयातील पडद्यामागच्या हिरोंबद्दल

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा दोन कारणामुळे नेहमीच लक्षात राहिल. पहिला म्हणजे, ३६ धावांवर ऑलआउट झालेला आणि दुसरा म्हणजे पराभवानंतर खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत बॉर्डर-गावसकर मालिकेवर नाव कोरलं. अॅडिलेड येथे पराभव झाल्यानंतर मेलबर्न कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघानं दमदार पुनरागमन केलं. या विजायाची योजना पराभवानंतर मध्यरात्री तयार करण्यात आली होती. श्रीधरन यांनी अश्विनच्या युट्यूब चॅनलवर मालिका विजयातील पडद्यामागचं गुपीत सांगितलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान १७ डिसेंबर रोजी अॅडिलेड येथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. कसोटी सामन्यातील आतापर्यंतची निचांकी धावसंख्या ३६ भारतीय संघाच्या नावावर झाली होती. भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनानंतर सर्वच बाजूनं टीकेचा भडीमार सुरु झाला होता. त्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवरही परिणाम झाला होता. त्या दुर्देवी क्षणानंतर खेळाडूंना व्यवस्थित झोप आली नाही. त्याच मध्यरात्री मेलबर्न विजायाची योजना तयार करण्यात आली. श्रीधरन म्हणाले की,  अॅडलेड येथील पराभवानंतर रात्री साडेबारा वाजता ‘काय करतोय म्हणून’ विराट कोहलीचा मला मेसेज आला. विराट कोहलीचा यावेळी आलेला मॅसेज वाचून मी चकीत झालो. मी त्याला सांगितलं, रवी शास्त्री, मी, भरत अरूण आणि विक्रम राठोड एकत्र बसलो आहे. त्यावर तो म्हणाला, मीही आलोच…  त्यावेळी मिशन मेलबर्नची योजना आखण्यात आली. विराट कोहलीनं त्यानंतर रहाणेलाही बोलवलं.

आणखी वाचा- विराट नाही, रहाणेनंच कसोटी संघाचं नेतृत्व करावं – बिशन सिंग बेदी

ठोस प्रत्त्युत्तर देण्यासाठी विजय आवशक होता –
आर. श्रीधर व्हिडीओत म्हणालेत की, परभवाचा वचपा काढण्यासाठी आणि प्रत्त्युत्तर देण्यासाठी मेलबर्न कसोटीत विजय आवशक होता. त्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी रवी शास्त्रीच्या मदतीन योजना आखली.

३६ धावांवर सर्वबाद होणं खूण झाल्यासमान – शास्त्री
श्रीधर म्हणाले की, मध्यरात्री कोहली आमच्याकडे आला त्यानंतर चर्चा सुरु झाली. यामध्ये मिशन मेलबर्नची योजना आखण्यात आली. यावेळी शास्त्री म्हणाले की, ३६ धावांवर सर्वबाद होणं म्हणजे खून झाल्यासमान आहे. ३६ धावांवरील सर्वबाद भारतीय संघाला महान बनवेल.

आणखी वाचा- अजिंक्यला कांगारुचा केक कापण्यास सांगितलं मात्र…; ही बातमी वाचून तुम्हालाही वाटेल रहाणेचा अभिमान

कोहलीनं अजिंक्यला बोलवलं –
श्रीधर म्हणाले की, ‘ मेलबर्न कसोटीसाठी योजना आखली होती, पण आम्हाला थोडी शंका होती. असं म्हणा की आम्ही गोंधळलेलो होतो. आम्हाला समजत नव्हत की काय करावं. त्यानंतर विराट कोहलीनं अजिंक्य रहाणेला बोलवलं, आणि योजानेवर काम करण्यात आलं. सकाळी आमच्यामध्ये आणखी स्पष्टपणे बोलणं झालं. कमी धावसंख्येवर बाद झाल्यानंतर फलंदाजी बळकट केली जाते. पण रवी शास्त्री, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी गोलंदाजी मजबूत करण्याची योजना आखली. त्यामुळे विराट कोहलीच्या जागी रविंद्र जाडेजाला खेळवलं. हा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला.

डाव्या हाताच्या फलंदाजाची योजना प्रभावी ठरली –

श्रीधर म्हणाले की, रवी शास्त्री यांच्यामते संघात डाव्या हाताच्या फलंदाजाची संख्या वाढवायला हवी. त्यांच्यामते डाव्या आणि उजव्या हाताचे फलंदाज असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना एका टप्यावर गोलंदाजी करता येणार नाही. ही योजनाही यशस्वी ठरली. याचवेळी संघात पाच गोलंदाज खेळवण्याचाही निर्णय घेण्यात आला.

जास्त सराव न करण्याचा निर्णय –
श्रीधर म्हणाले की, ‘अनेक मुद्दयावर चर्चा झाल्यानंतर आम्ही जास्त सराव न करण्याचा निर्णय घेतला. एकप्रकारे आम्ही खेळाडूंना एक दिवसाची सुट्टी दिली तसेच जेवण करायलाही बोलवलं. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खेळही खेळले. कधीकधी एकटेपणामुळे माणसांमध्ये नकारात्मकता येते, ती दूर करण्याचा प्रयत्न केला. यासर्वांचा निकालावर परिणाम झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 3:58 pm

Web Title: virat kohlis midnight call that led to mission melbourne nck 90
Next Stories
1 बुमराहचं भावनिक ट्विट; म्हणाला, “तू नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील…”
2 टीम इंडियानं शिकवला ‘आत्मनिर्भर भारत’चा धडा – पंतप्रधान मोदी
3 Video: सामना सुरू असताना २० वर्षीय कबड्डीपटूचा मृत्यू
Just Now!
X