ICC ने बुधवारी २०१९ या वर्षातील पुरस्कार जाहीर केले. त्यात तीन भारतीय खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. सलामीवीर रोहित शर्मा याला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडूचा पुरस्कार मिळाला. वेगवान गोलंदाज दीपक चहर याला बांगलादेशविरूद्धच्या कामगिरीसाठी सर्वोत्तम टी २० कामगिरीचा पुरस्कार मिळाला. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार मिळाला.

ICC Spirit of Cricket : विराटच्या ‘त्या’ एका स्तुत्य कामगिरीसाठी मिळाला पुरस्कार

पुरस्कारावर काय म्हणाला विराट?

विराटला हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यावर विराटने मत व्यक्त केले. तो म्हणाला की गेली अनेक वर्षे मी वाईट गोष्टींमुळे सतत चर्चेत असायचो, पण आता ICC चा खेळभावना पुरस्कार मला मिळाल्याने मी चकित झालो. त्या वेळेला मी स्मिथची परिस्थिती समजू शकत होतो. त्याच्या या परिस्थितीचा चाहत्यांनी फायदा घेण्याची गरज नव्हती. चाहत्यांचे हे वागणे स्वीकारण्याजोगे नव्हते. कोणत्याही खेळात चाहत्यांनी खेळाडूचे मनोधैर्य खच्ची करण्याऐवजी त्याला पाठिंबा देणे आवश्यक असते. चाहत्यांची तोंडे बंद करत मी सुद्धा स्मिथला पाठिंबा दिला होता. त्या कृतीसाठी मला पुरस्कार मिळाला याचा मला आनंद आहे.

पाहा Photo – ICC Awards : पाहा टीम इंडियाला मिळाले किती पुरस्कार…

काय घडला होता प्रकार?

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला. त्यात कर्णधार विराट कोहलीच्या एका कृतीने सर्वांचीच मनं जिकली होती. सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली होती. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीला आवडला नाही. त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले होते. इतकंच नव्हे तर त्याने स्मिथसाठी टाळ्या वाजवा असं प्रेक्षकांना सांगितले होतं आणि या प्रकारासाठी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफीदेखील मागितली होती.