21 October 2020

News Flash

प्रत्येकाला निवृत्त व्हायचंय…पण तुझं संघासाठी योगदान कायम लक्षात राहील !

धोनीच्या निवृत्तीनंतर विराटची भावूक प्रतिक्रिया

भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक अशी ओळख मिळालेल्या धोनीने अखेरीस आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम केलं आहे. १५ ऑगस्टच्या संध्याकाळी धोनीने सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं सांगितलं. भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या कर्णधाराने अखेरीस निवृत्ती स्विकारली. धोनीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलं. विराटनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नेतृत्वगुणांमुळे एक वेगळी छाप पाडली.

धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच कोहलीनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक भावनिक संदेश लिहीला आहे. प्रत्येक खेळाडूला एक दिवस आपली कारकिर्द संपवायची असते. पण तू देशासाठी आणि संघासाठी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहिल असं विराटने म्हटलं आहे.

धोनीसोबतच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा करणाऱ्या सुरेश रैनालाही विराटने त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनी सध्या आगामी आयपीएल हंगामाची तयारी करतो आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामासाठी धोनी सज्ज झाला आहे. सध्या आपल्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. २० ऑगस्टनंतर चेन्नईचा संघ युएईला रवाना होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 9:54 pm

Web Title: virat share his emotional moment on ms dhoni retirement psd 91
Next Stories
1 ‘मैं पल दो पल का शायर हूं…’ गाणं शेअर करत धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
2 धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करा, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची बीसीसीआयला विनंती
3 कारकिर्दीची सुरुवात आणि अखेर धावबाद होऊनच…जाणून घ्या धोनीबद्दलचा हा योगायोग
Just Now!
X