18 March 2019

News Flash

लग्नानंतरची अशी आहे ‘विरुष्का’ची पहिली दिवाळी

एका चाहत्याला सुनावल्यामुळे कर्णधार विराट कोहली वादात सापडलेला असतानाच विराटने आणखी एक टि्वट केले आहे.

विराट कोहली, अनुष्का शर्मा

भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर दुसऱ्या देशात जाऊन राहा असे एका चाहत्याला सुनावल्यामुळे कर्णधार विराट कोहली वादात सापडलेला असतानाच विराटने आणखी एक टि्वट केले आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने विराटने पत्नी अनुष्का शर्मा सोबतचा एक फोटो एक टि्वट करुन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नानंतरची विराट आणि अनुष्काची ही पहिली दिवाळी आहे. मागच्यावर्षी ११ डिसेंबरला इटलीला मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दोघे विवाहबद्ध झाले.

अवश्य वाचा : भारतीय क्रिकेटपटू न आवडणाऱ्या चाहत्याला विराटचा ‘जय महाराष्ट्र’

यंदाची दिवाळी सर्वांना आनंदाची आणि भरभराटी जावो. प्रत्येकाला शांतता, आनंद आणि चांगले आरोग्य लाभो असे विराटने आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. विराट आणि अनुष्का दोघेही नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. टि्वटर, फेसबुकवरुन दोघांनी नेहमीच परस्परांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी अनुष्काने विराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडिया अकाऊंटवर विराटसमवेतचा फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छा देताना तिनं देवाचे आभार मानले होते. तो जन्मला म्हणून मी देवाचे आभार मानते असं लिहित तिनं विराटसोबतचा फोटो शेअर केला होता.

First Published on November 7, 2018 8:36 pm

Web Title: virat wishes happy diwali to everyone