ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱया आणि चौथ्या कसोटीसाठी भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागला संघातून काढण्यात आले आहे. सध्या फॉर्मात नसलेल्या सेहवागला पुढील दोन कसोटीसाठी संघात ठेवले जाणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते.
निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील दोन कसोटींसाठी भारतीय संघाची गुरुवारी घोषणा केली. मोहाली आणि दिल्लीमध्ये या दोन कसोटी होणार आहेत. सेहवाग टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज आहे. मात्र, गेल्या दोन्ही कसोटींमध्ये सलामीला येऊन तो फार चमकदार कामगिरी करू शकला नाही. दोन्ही कसोटींमधील एकूण तीन डावांत मिळून सेहवागने अवघ्या २७ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला संघातून काढण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
भारतीय संघ – महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, शिखर धवन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग, आर. अश्विन, प्रग्यान ओझा, अजिंक्य राहाणे, अशोक दिंडा, चेतेश्वर पुजारा.