भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मार्गदर्शक विरेंद्र सेहवागने आपल्या पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. 2016 पासून सेहवाग किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहत होता, आपल्या ट्विटक अकाऊंटवरुन सेहवागने आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे.

2014 आणि 2015 साली विरेंद्र सेहवाग किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला होता. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत असताना सेहवागने 25 सामन्यांमध्ये 554 धावा केल्या होत्या. मात्र 2016 सालापासून सेहवागने मार्गदर्शकाची भूमिका स्विकारली, यामध्ये एका शतकाचाही समावेश होता. 2016 साली पंजाबच्या संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. यानंतर उर्वरित हंगामात पंजाबच्या संघाने धडाकेबाज सुरुवात केली, मात्र नंतरच्या सामन्यांमध्ये पंजाबचा संघ ढिला पडत गेला. नुकतच न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांची किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.