ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर मायदेशी परतलेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पहिल्या सामन्यात दारूण पराभवानंतर मालिका जिंकण्याचा पराक्रम केल्यामुळे अजिंक्य रहाणेसह विजयीवीरांवर चौहैबाजूनं कौतुकांचा वर्षाव होत आहे. तामिळनाडूच्या नटराजानं याचेही त्याच्या गावात जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

तामिळनाडूमधीलसलेम जिल्ह्यातील चिन्नपमपट्टी गावात नटराजन गुरुवारी पोहचला. नटराजन याचं त्याच्या गावात जल्लोषात स्वागत झालं. इथं त्याच्यासाठी चक्क घोड्याचा रथ आणला होता. या बग्गीवर त्याला मिरवत-मिरवत घरी नेहण्यात आलं. यासगळ्या मिरवणुकीत त्याला शेकडो चाहत्यांनी सतत घेरलेलं होतं.

आणखी वाचा- अजिंक्यला कांगारुचा केक कापण्यास सांगितलं मात्र…; ही बातमी वाचून तुम्हालाही वाटेल रहाणेचा अभिमान

नटराजनच्या स्वगाताचा व्हिडीओ भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागन यानं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.  विरेंद्र सेहवागनं व्हिडीओ शेअर करताना म्हटले की, ‘स्‍वागत नहीं करोगे.. हा भारत आहे… आि इथं क्रिकेट फक्त खेळ नाही. त्याहून खूप काही आहे. नटराजन सलेम जिल्ह्यातील चिन्नपमपट्टी गावी पोहचला तेव्हा त्याचं असं जंगी स्वागत करण्यात आलं. काय कमाल कथा आहे!’

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा- IND vs AUS: ‘जेवढं यश भारतीय संघाचं तितकचं’…इंझमाम उल हक म्हणाला…

दुबई येथे झालेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामा नटराजन यानं आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलं होतं. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती. एका सर्वसमान्य कुटुंबातून आलेल्या नटराजनची भारतीय संघात निवड झाली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नटराजन यानं भारतीय संघाकडून एकदिसीय, टी-२० आणि कसोटी सामन्यात पदार्पण केलं. नटराजन यानं पदार्पणात सुरेख कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली.