गेल्या काही दिवसांत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजी माजी क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. सुरूवातीला पाकिस्तानचा वेगवान माजी गोलंदाज शोएब अख्तर याने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा प्रस्ताव ठेवला. त्यात भारताकडून कपिल देव, सुनील गावसकर यांनी; तर पाकिस्तानकडून रमीझ राजा, शाहिद आफ्रिदीने उडी घेतली. त्यातून बरेच वाद झाले. त्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अकीब जावेद याने मॅच फिक्सिंगचे सारं खापर भारतावर फोडत भारत हेच मॅच फिक्सिंग माफियांचं आश्रयस्थान आहे, असा खळबळजनक आरोप केला. त्यातनंतर आता आणखी एका पाकिस्तानी खेळाडूने विचित्र वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे.

१९ वर्षाचा सचिन कसा दिसायचा माहितीये का?

“सेहवागचे विक्रम हेच त्याच्या दमदार खेळाची पावती आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सेहवागच्या आठ हजारांपेक्षा जास्त धावा आहेत. तो कायम मोठ्या खेळाडूंच्या सावलीत राहिला. तो सचिनबरोबर खेळला, राहुल द्रविडबरोबर खेळला; आणि त्यांच्याच सावलीत राहिला. (त्यामुळे त्याच्याकडे काही अंशी दुर्लक्ष झालं.) जर सेहवाग भारताऐवजी दुसऱ्या कोणत्या देशाकडून खेळला असता, तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा सहज ओलांडला असता, कारण त्याला केवळ दीड ते दोन हजार धावाच करायच्या होत्या”, असं रोखठोक मत रशीद लतीफने व्यक्त केलं.

रशीद लतीफ

IPL : ‘या’ संघासाठी आम्ही दोन-दोन तास ‘प्लॅनिंग’ करतो – रोहित शर्मा

“सेहवाग नेहमी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायचा. आमच्यासारखे सलामीवीर आधी स्टेडियम आणि खेळापट्टीचा अंदाज घ्यायचो, त्यानंतर गोलंदाज कोण आहे ते बघायचो. कारण आमच्या काळी ग्लेन मकग्रा, ब्रेट ली, वसीम अक्रम किंवा शोएब अख्तर यासारखे वेगवान प्रतिभावान गोलंदाज होते. पण तशा परिस्थितीतही सेहवाग कोणाला घाबरला नाही. तो खूप प्रभावशाली खेळाडू होता. त्याच्या संघातील खेळाडूंवर त्याचा खूप प्रभाव दिसून येतो”, असे रशीद लतीफ म्हणाला.