News Flash

सेहवागने शेअर केला भन्नाट VIDEO; म्हणाला, “बिवी की लाठी…”

तुम्ही पाहिलात का 'हा' व्हिडीओ...

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आपल्या कारकिर्दीत फटकेबाजीमुळे चर्चेत असायचा. निवृत्तीनंतर हल्ली तो त्याच्या सोशल मिडियावरील शाब्दिक फटकेबाजीमुळे चर्चेत असतो. कोणत्याही संवेदनशील विषयावर अतिशय मिस्कीलपणे भाष्य करण्याची कला सेहवागला अवगत आहे. चाहत्यांनाही त्याच्या या हटके ट्विट्सचा प्रत्यय वारंवार आला आहे. पण यावेळी सेहवागने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील धमाल त्याने अतिशय मजेशीर पद्धतीने मांडली आहे.

सेहवागने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका गावात जोरदार पार्टी सुरू आहे. त्यात एक वयस्क माणूसही तरूणांच्या खांद्याला खांदा लावून नाचताना दिसत आहे. तो माणूस नाचत असतानाच अचानक तो माणूस घाबरतो आणि पळायला लागतो. नक्की काय झालं? हे काही काळ कळत नाही. पण नंतर एक म्हातारी बाई हातात काठी घेऊन त्या माणसाच्या मागे धावताना दिसते. त्यानंतर सगळा उलगडा होता.

पाहा तो व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag)

या व्हिडीओबद्दल कॅप्शनमध्ये सेहवागने लिहिले आहे, “वय हे सारखं बदलत असतं. पण बायकोने उगारलेली काठी (बिवी की लाठी) ही कायमच धडकी भरवणारी असते!” या कॅप्शनमध्ये त्याने बायकोची भीती असा हॅशटॅगदेखील वापरला आहे. त्याचसोबत, नवरा-बायकोची ही कथा सगळीकडे सारखीच आहे असंही नमूद केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 3:13 pm

Web Title: virender sehwag shares hilarious video of old couple says comically biwi ki laathi is permanent see instagram video vjb 91
Next Stories
1 HBD Pujara: BCCIने केला पुजाराचा सन्मान; बहाल केली मानाची पदवी
2 ‘त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त’…ऋषभ पंतचं महत्त्वाचं विधान
3 भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय द्रविडला दिलं जात असतानाच, द्रविड म्हणतो…
Just Now!
X