14 August 2020

News Flash

सेहवागने शेअर केला घरावरून फिरणाऱ्या टोळांचा व्हिडीओ

दिल्लीवर टोळधाडीचे संकट; राज्य सरकार सज्ज

राजस्थानमधील पिकांची नासधूस केल्यानंतर आता टोळधाडीने गुरूग्राममध्ये शनिवारी उच्छाद मांडला. गुरूग्राममध्ये टोळांची झुंड आल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने त्या विभागात रेड अलर्ट जारी केला. तसेच पीटीआयच्या वृत्तानुसार टोळधाड दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचे निश्चित समजलेले नाही, पण तरीदेखील सरकार मात्र या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. गुरूग्राममधील टोळधाडी संदर्भात तातडीच्या बैठकीनंतर दिल्ली राज्य सरकार लवकरच याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करेल, असे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले. शुक्रवारी टोळधाडीने हरयाणामध्ये पिकांचे नुकासन केले होते. त्यानंतर शनिवारी गुरूग्राममध्ये टोळांची झुंड दिसून आली.

गेले तीन-चार महिने सारेच जण करोनाच्या भीतीने घरात आहेत. भारताचा धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग हा देखील घरातच आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याच्या घरावरून उडणाऱ्या टोळांची झुंड त्याने पोस्ट केली आहे. तो दिल्लीच्या आसपासच्या परिसरात वास्तव्यास आहे. तेथे टोळधाडीचे संकट असल्याचे त्याने व्हिडीओमधून सांगितले आहे. पाहा तो व्हिडीओ –

दरम्यान, सेहवाग मार्च २०२० पासून आपल्या घरातच आहे. लॉकडाउनमुळे तो कुठेही बाहेर गेलेला नाही. IPL 2020 मध्ये तो समालोचक म्हणून काम पाहणार होता, पण करोनाच्या तडाख्याने IPL 2020 देखील आता लांबणीवर पडले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 6:39 pm

Web Title: virender sehwag shares video of locust attack over his house vjb 91
Next Stories
1 पाकिस्तानचं चाललंय काय… करोना पॉझिटिव्ह १० पैकी ६ खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह
2 शोएबनं लाइव्ह चॅटमध्ये केलं माहिराशी फ्लर्ट; सानियाने मध्येच विचारलं…
3 WC 2019 Video : टीम इंडियाच्या दणक्याने आजच स्पर्धेबाहेर गेला होता वेस्ट इंडिजचा संघ
Just Now!
X