News Flash

आयपीएलमधील ‘बाहुबली’ला पाहिलंत का?

सोशल मीडियावर 'या' बाहुबलीची चर्चा

छायाचित्र सौजन्य- क्रिकेट लाईव्ह

आयपीएलच्या दहाव्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार जबरदस्त डेव्हिड वॉर्नर फॉर्मात दिसतो आहे. डेव्हिड वॉर्नरने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात झंझावाती शतक झळकावले. वॉर्नरच्या बॅटचा तडाखा इतका जबरदस्त होता की संघाने उभारलेल्या आव्हानाच्या निम्म्याहून अधिक धावा वॉर्नरने केल्या होत्या. वॉर्नरच्या घणाघाती फलंदाजीमुळे हैदराबादने कोलकात्यावर ४८ धावांनी सफाईदार विजय मिळवला. वॉर्नरच्या फलंदाजीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर अनेकांनी वॉर्नरला ‘बाहुबली’ म्हटले आहे.

Next Stories
1 IPL 2017 , MI vs RCB : मुंबईचा ‘रॉयल’ विजय, रोहितकडून कोहलीचे ‘पॅकअप’
2 अझलन शाह हॉकी स्पर्धा : भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी
3 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : नवा डाव, जुने प्रतिस्पर्धी!
Just Now!
X