01 December 2020

News Flash

Happy Birthday Rohit! रोहितच्या वाढदिवशी सेहवागच्या ‘टॅलेंटेड’ शुभेच्छा

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहित जगातला असा एकमेव फलंदाज आहे, ज्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकांची नोंद आहे. चेन्नई सुपरकिंग्सविरोधातील सामन्यात अर्धशतक ठोकून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत रोहितने दिले आहेत.

वाढदिवसानिमित्त जगभरातून रोहित शर्मावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही रोहितला शुभेच्छा दिल्या आहेत. टॅलेंटची टाकी नेहमी भरलेली असते…हा माझा आवडता खेळाडू आहे आणि त्याला फलंदाजी करताना नेहमीचं आवडतं. तुझी भरभराट होऊ दे आणि तुझ्यातील प्रतिभा अशीच जिवंत असूदे असं ट्विट सेहवागने केलं आहे. त्यासोबत सेहवागने मॉर्फ केलेला रोहितचा एक फोटो ट्विट केला असून यामध्ये तो एमआरएफच्या बॅटसह दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 3:52 pm

Web Title: virender sehwag wishes rohit sharma on his 31st birthday
Next Stories
1 Video: द्रविडच्या साधेपणावर प्रेक्षक फिदा, RCB चा प्रशिक्षक बनवण्याची मागणी
2 भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
3 खटला हरलात तर क्रिकेट खेळावंच लागेल, पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी बीसीसीआयला डिवचलं
Just Now!
X