News Flash

विष्णू, गणपती-वरुण ऑलिम्पिकसाठी पात्र

भारताच्या चार नौकानयनपटूंची प्रथमच ऑलिम्पिकवारी

(संग्रहित छायाचित्र)

आशियाई नौकानयन पात्रता फेरी

भारतीय नौकानयनपटूंनी गुरुवारचा दिवस संस्मरणीय ठरवला. विष्णू सारावानन तसेच गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर या जोडीने ओमान येथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला.

भारताच्या तब्बल चार नौकानयनपटूंनी ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. नेत्रा कुमानन हिने बुधवारी लेझर रेडियल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाआधी विष्णू तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गुरुवारी त्याने थायलंडच्या किराती बुआलाँग याचा पराभव करत एकूण दुसरे स्थान पटकावत टोक्यो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. त्यानंतर चेंगाप्पा आणि ठक्कर या डोडीने ४९ईआर क्लास प्रकारात गुणतालिकेत सर्वोत्तम स्थान पटकावत ऑलिम्पिकचे स्थान प्राप्त केले. या दोघांनी इंडोनेशिया येथे झालेल्या २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.

‘‘नौकानयनपटू, पालक आणि प्रशिक्षकांनी इतक्या वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले,’’ असे  भारताचे प्रशिक्षक टोमास्झ जानूझेवस्की यांनी ओमानहून सांगितले.

नेत्री कुमानन, विष्णू सारावानन तसेच केसी गणपती आणि वरुण ठक्कर या चौघांचेही टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याबद्दल अभिनंदन. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला नौकानयनपटू ठरलेल्या नेत्राचे विशेष अभिनंदन. भारताचे खेळाडू सर्व क्रीडाप्रकारात चमकत आहे, हे नक्कीच नमूद करावे लागेल.

– किरेन रिजिजू,  केंद्रीय क्रीडामंत्री

तीन विविध प्रकारात भारताचे चौर नौकानयनपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. भारतीय नौकानयन खेळाच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे. भारीतय नौकानयन खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार.

– कॅप्टन जितेंद्र दीक्षित, भारतीय नौकानयन असोसिएशनचे उपसरचिटणीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:14 am

Web Title: vishnu ganapati varuna eligible for the tokyo olympics abn 97
Next Stories
1 महाराष्ट्राच्या तीन कबड्डीपटूंना करोनाची लागण
2 तेंडुलकर इस्पितळातून घरी
3 ऑनलाइन बुद्धिबळात फसवणूक करणे सोपे!
Just Now!
X