18 January 2018

News Flash

महाराष्ट्र टेनिस प्रीमिअर लीग : विष्णू वर्धन ठरला महागडा खेळाडू

ऑलिम्पिक व डेव्हिसपटू विष्णू वर्धन हा महाराष्ट्र टेनिस प्रीमिअर लीग स्पर्धेतील सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. त्याला अ‍ॅक्युरेट एसेस संघाने एक लाख ९० हजार रुपयांना

क्रीडा प्रतिनिधी, पुणे | Updated: January 5, 2013 2:21 AM

ऑलिम्पिक व डेव्हिसपटू विष्णू वर्धन हा महाराष्ट्र टेनिस प्रीमिअर लीग स्पर्धेतील सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. त्याला अ‍ॅक्युरेट एसेस संघाने एक लाख ९० हजार रुपयांना विकत घेतले आहे.टेनिसमधील या पहिल्याच प्रीमिअर लीग स्पर्धेस डेक्कन जिमखाना क्लबवर १४ जानेवारीस प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा १९ जानेवारीपर्यंत चालणार असून, त्याकरिता पाच फ्रँचाईजी तयार करण्यात आल्या आहेत. वर्धन याच्या खालोखाल साकेत मिनेनी व सनमसिंग यांना भाव मिळाला असून, त्यांना प्रत्येकी एक लाख ६५ हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. त्यांना अनुक्रमे बेसलाईन बॉम्बर्स व मुंबई ब्लास्टर्स यांनी विकत घेतले आहे.
महिलांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रेरणा भांब्री हिला सर्वाधिक एक लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. तिला शार्प स्मॅशर्स संघाने विकत घेतले आहे. तिच्या खालोखाल ऋतुजा भोसले या पुण्याच्या खेळाडूस ९५ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. तिला मुंबई ब्लास्टर्सने विकत घेतले आहे.
ही स्पर्धा सांघिक लढतींची असून पुरुष, महिला एकेरी, पुरुष दुहेरी व मिश्रदुहेरी या लढतींचा त्यामध्ये समावेश राहणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन व अखिल भारतीय टेनिस महासंघ यांच्या मान्यतेने होणार आहे.
स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू व त्यांची किंमत याप्रमाणे- अ‍ॅक्युरेट एसेस-विष्णू वर्धन (१.९० लाख), रिशिका सुन्कारा (८५ हजार), अरुण प्रकाश (५६ हजार), कायरा श्रॉफ (५४ हजार), पी.व्हिग्नेश (३१ हजार), केदार शहा (२० हजार).
बेसलाईन बॉम्बर्स-साकेत मिनेनी (१.६५ लाख), अर्जुन कढे (एक लाख), प्रार्थना ठोंबरे (७५ हजार), रोहन गज्जर (५० हजार), नताशा पालाह व सिद्धार्थ रावत (प्रत्येकी ३० हजार).
डॅझलींग डय़ुसेस-मोहित मयूर व विजय प्रशांत (प्रत्येकी एक लाख), अंकिता रैना (८५ हजार), दिविज शरण (९० हजार), त्रिदा भट्टाचार्य (३० हजार), आदित्य मडकईकर (३१ हजार).
मुंबई ब्लास्टर्स- पुरव राजा (एक लाख), सनमसिंग (१.६५ लाख), ऋतुजा भोसले (९५ हजार), इती मेहता (३० हजार), काझा विनायक शर्मा (३१ हजार), अजय सेल्वराज (२० हजार). शार्प स्मॅशर्स- विजयंत मलिक (१.२० लाख), व्ही. एम. रणजित (१.०५ लाख), प्रेरणा भांब्री (एक लाख), बाळू शर्मा (५४ हजार), रोनक मनुजा (२० हजार).

First Published on January 5, 2013 2:21 am

Web Title: vishnuvardhan costly tennis player for maharashtra tennis premier league
  1. No Comments.