25 September 2020

News Flash

भारत दौऱ्यावर जाणे आता अधिक सोपे -बॉयकॉट

भारतीय क्रिकेट संघाच्या आव्हानात आता फारसा दम नाही. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांसाठी आता भारत दौऱ्यावर जाणे अधिक सोपे आहे, असे मत इंग्लंडचा महान फलंदाज जेफ

| December 19, 2012 07:57 am

भारतीय क्रिकेट संघाच्या आव्हानात आता फारसा दम नाही. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांसाठी आता भारत दौऱ्यावर जाणे अधिक सोपे आहे, असे मत इंग्लंडचा महान फलंदाज जेफ बॉयकॉट यांनी व्यक्त केले आहे. भारतीय क्रिकेट सध्या संक्रमणातून जात आहे, असे ते पुढे म्हणाले.
‘‘काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटकडे सक्षम कसोटी संघ होता. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्यासारखे दिग्गज कसोटी फलंदाज भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावरून निवृत्त झाले आहेत. सचिन तेंडुलकर हा आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवत नाही,’’ असे मत बॉयकॉट यांनी एका वृत्तपत्रामधील स्तंभात व्यक्त केले.
‘‘हरभजन सिंग आणि झहीर खान हे अप्रतिम गोलंदाज आहेत. पण तो इतिहास झाला आहे. आता भारतात जाणे अधिक चांगले झाले आहे. याची आणखी कारणे म्हणजे अधिक चांगल्या प्रतीची हॉटेल्स, इंग्लिश खाद्यपदार्थ आणि शहरांमधील प्रवास फार सोपा झाला आहे,’’ असे बॉयकॉट यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 7:57 am

Web Title: visit to india is more easy boycott
टॅग Sports
Next Stories
1 इंग्लिश संघाच्या शिकण्याच्या व आत्मसात करण्याच्या वृत्तीचे फ्लॉवरकडून कौतुक
2 ऑल इंग्लंड आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे सायनाचे लक्ष्य
3 विजय कुमार, गगन नारंग, अभिनव बिंद्रा राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार
Just Now!
X