News Flash

चांगले यश मिळवण्याबाबत आनंद आशावादी

कारकीर्दीत कधी कधी विजयासोबत अपयशासही सामोरे जावे लागत असते.

| March 18, 2017 02:10 am

कारकीर्दीत कधी कधी विजयासोबत अपयशासही सामोरे जावे लागत असते. अर्थात अपयशाबाबत कोणतेही मानसिक दडपण न घेता यंदाच्या विविध स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करण्याची मला खात्री आहे, असे भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सांगितले.

आनंद हा यंदा जागतिक स्तरावरील पाच स्पर्धा तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये भाग घेणार आहे. याबाबत आनंद म्हणाला, ‘‘झुरिच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम यश मिळवण्यावर माझा भर असेल. पी. हरीकृष्णने जागतिक मानांकनांत पहिल्या ५० क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्याने खूपच नेत्रदीपक प्रगती केली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणाऱ्या पात्रता स्पर्धेत हरी चांगले यश मिळवेल अशी मला आशा आहे. बी.अधिबानचीही झेप उत्तुंग होत चालली आहे. त्याने कोरस स्पर्धेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले, तसेच त्याने आव्हानवीर सर्जी कर्जाकिनवर मात करीत सनसनाटी कामगिरी केली होती. त्याच्या खेळात खूपच विविधता आहे व वेगवेगळ्या पद्धतीने डावाची सुरुवात करीत प्रतिस्पध्र्याला चकीत करण्याची क्षमता आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 2:10 am

Web Title: viswanathan anand 7
Next Stories
1 रिअल माद्रिदसमोर बायर्न म्युनिकचे आव्हान
2 नक्षल हल्ल्यातील हुतात्म्यांच्या वारसांना सायनाने दिले ६ लाख रुपये
3 VIDEO: बॅडमिंटन कोर्टवरच ‘फुलराणी’चा वाढदिवस
Just Now!
X