दोन सलग पराभवांची मालिका विश्वविजेज्या विश्वनाथन आनंदने खंडित केली. ताल स्मृतिचषक बुद्धिबळ स्पध्रेच्या सातव्या फेरीत आनंदने अझरबैजानच्या शाखरियार मामेडय़ारोव्हविरुद्ध खेळताना सहजपणे बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.
पाचव्या फेरीत नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि सहाव्या फेरीत हिकारू नाकामुराकडून पराभूत झाल्यामुळे आनंद शेवटच्या स्थानावर फेकला गेला होता. परंतु सातव्या फेरीत काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने अर्धा गुण पदरात पाडून घेतला. इस्रायलच्या बोरिस गेल्फंडने काळ्या मोहऱ्यांनिशी स्पध्रेतील आघाडीवर नाकामुराला पराभूत केले.