पाच विश्वविजेतेपदे नावावर असणाऱ्या विश्वनाथन आनंदला जिब्राल्टर बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. २३ वर्षांत पहिल्यांदाच आनंद खुल्या स्वरुपाच्या स्पर्धेत सहभागी होत आहे. फ्रान्सचा ग्रँडमास्टर अ‍ॅड्रियन दिमुथने आनंदवर मात केली. पी.हरिकृष्णा आणि अभिजीत गुप्ता पाचव्या फेरीअखेर ४.५ गुणांसह संयुक्तपणे अव्वलस्थानी आहेत. हरिकृष्णाने सी.पी. सेतुरामनवर विजय मिळवला तर अभिजीतने हंगेरीच्या झोल्टान अलसामीला नमवले. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदला सलामीच्या लढतीत बरोबरीत समाधान मानावे लागले होते. रु लोपेझ पद्धतीद्वारे खेळणाऱ्या आनंदला दिमुथविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

 

शार्दूल गागरेचा चौथा विजय
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई</strong>
ग्रँडमास्टर शार्दूल गागरेने आयआयएफएल वेल्थ मुंबई आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पध्रेत चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयाबरोबर शार्दूलने आंतरराष्ट्रीय मास्टर स्वप्निल धोपडे आणि स्टॅनी जी. ए. यांच्यासह संयुक्त आघाडी घेतली आहे. शार्दूलने रविवारी भाविक भारंबेवर विजय मिळवला. त्याच्या खात्यात चार गुण जमा झाले आहेत.