News Flash

चौथ्या फेरीत कर्जाकिनचा आनंदवर सनसनाटी विजय

रशियाच्या सर्जी कर्जाकिन याने त्याला पराभवाचा धक्का दिला.

| March 16, 2016 07:29 am

भारताच्या विश्वनाथन आनंद याची जागतिक कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेतील अपराजित राहण्याची मालिका चौथ्या फेरीत खंडित झाली. रशियाच्या सर्जी कर्जाकिन याने त्याला पराभवाचा धक्का दिला.चुरशीने झालेल्या डावात सर्जी याने हत्ती व घोडा यांचा कल्पकतेने उपयोग केला. डावाच्या शेवटी आनंदकडेही एक हत्ती व एक घोडा होता. मात्र सर्जी याने त्याला कोंडित पकडले. आपला पराभव अटळ आहे, हे लक्षात येताच आनंदने ४३ व्या चालीत डाव सोडून दिला. चौथ्या फेरीअखेर सर्जी याचे तीन गुण झाले आहेत. त्याने आतापर्यंत दोन डावजिंकले व दोन डाव बरोबरीत सोडविले आहेत. आनंद हा दोन गुणांवरच राहिला. त्यामध्ये त्याने एक डावजिंकला तर दोन डाव बरोबरीत रोखले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 7:29 am

Web Title: viswanathan anand loses to karjakin in candidates chess
टॅग : Viswanathan Anand
Next Stories
1 आशियाई ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर
2 भारतीय संघाच्या पराभवाची पाच कारणे
3 विंडीज-पाकिस्तान यांच्यात आज लढत
Just Now!
X