पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या विश्वनाथन आनंदने अचूक तयारीनिशी मॅग्नस कार्लसनला नवव्या डावात बरोबरीत रोखले, पण आनंदसाठी विश्वविजेतेपद कमावणे हे कठीण होऊन बसले आहे. नॉर्वेच्या k05मॅग्नस कार्लसनने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या या लढतीत एका गुणाच्या आघाडीसह विश्वविजेतेपद जिंकण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले.
काळ्या मोहऱ्यांनिशी नवव्या डावात खेळावे लागणार, यासाठी आनंद उत्तम k07तयारी करून आला होता. त्यामुळे २०व्या चालीत त्याने हा डाव सहजपणे बरोबरीत सोडवला. आता गतविजेत्या कार्लसनने ५-४ अशी आघाडी घेतली असून आणखी एका सामन्यातील विजयानंतर त्याचे जगज्जेतेपद निश्चित होणार आहे. पण जगज्जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखण्यासाठी आनंदला विजय मिळवणे अनिवार्य आहे. पुढील तीन फेऱ्यांपैकी दोन डावांत आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा मिळणार आहे. आनंदने एका डावात विजय आणि दोन डाव बरोबरीत सोडवल्यास, जगज्जेतेपदाचा मुकाबला टायब्रेकरमध्ये रंगणार आहे.
काळ्या मोहऱ्यासंह खेळताना आनंदने कोणताही धोका पत्करला नाही. कार्लसन या डावात विजयासाठी प्रयत्न करेल, असा अनेकांचा होरा होता. पण बर्लिन बचावात्मक पद्धतीतील आनंदच्या तयारीपुढे कार्लसनला आक्रमक चाली करता आल्या नाहीत. त्यामुळे २० चालींमध्ये हा सामना बरोबरीत सुटला. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळाच्या लढतीतील हा आतापर्यंतचा सर्वात कमी चालींचा सामना ठरला. डावाच्या सुरुवातीला आनंदची बाजू भक्कम होती. चौथ्या चालीला कार्लसनने कॅसलिंग केल्यानंतर आनंदने घोडय़ाच्या साहाय्याने त्याची प्यादी घेतली. आठव्या चालीला वजिरा-वजिरी केली. १२व्या चालीनंतर सामना बरोबरीत सुटेल, हे जवळपास निश्चित झाले होते. अखेरच्या पाच चालींमध्ये दोघांनी सारख्याच चाली रचल्या. सामना बरोबरीत सोडवल्यानंतर आनंदने समाधान व्यक्त केले.