भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदने अल्खाईन स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीत गतविजेत्या व्लादिमीर क्रॅमनिक याला बरोबरीत रोखले.
आनंदचे आता सहा गुण झाले आहेत. लाग्रेव्हने चार गुणांसह आघाडीस्थान घेतले आहे. बोरिस गेल्फंड (इस्रायल), मायकेल अॅडम्स (इंग्लंड), लॉरेन्ट फ्रेसिनेट (फ्रान्स) व लिवॉन अरोनियन यांनी प्रत्येकी साडेतीन गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. गेल्फंडला मॅक्झिम व्हॅचिअर-लाग्रेव्हविरुद्धच्या डावात बरोबरी स्वीकारावी लागली. अरोनियन याने अॅडम्सशी बरोबरी साधली. फ्रेसिनेट याला निकित व्हितुगोव्हने बरोबरीत रोखले.
आनंदला उर्वरित दोन फे ऱ्यांमध्ये पांढऱ्या मोहऱ्यांच्या साहाय्याने खेळण्याचा फायदा मिळणार आहे. या फे ऱ्यांमध्ये त्याला फ्रेसिनेट व पीटर स्विडलर यांच्याशी खेळावे लागेल.