News Flash

काय करावं या प्रेक्षकाचं..? चालू क्रिकेट सामन्यात महिलेशी केलं असभ्य वर्तन!

सामन्यापेक्षा या व्यक्तीचं कृत्य होतंय सोशल मीडियावर व्हायरल

व्हायटलिटी ब्लास्टच्या सामन्यादरम्यान एका व्यक्तीचे महिलेसोबत गैरवर्तन

क्रिकेट हा ‘जंटलमन्स गेम’ म्हणून ओळखला जातो. कधीकधी खेळाडूंचा मैदानात संयम सुटतो आणि ते काहीतरी विचित्र करून बसतात. मात्र इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या व्हायटलिटी ब्लास्टच्या सामन्यात खेळाडूंनी नव्हे, तर एका प्रेक्षकाने असभ्य वर्तन केले आहे. त्याने एका  महिलेसोबत गैरवर्तन केले, त्यानंतर या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लंडनमध्ये सरे आणि मिडलसेक्स यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे.

या सामन्यात सरेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. स्टीव्हच्या अर्धशतक आणि डारील मिशेलच्या ५८ धावांच्या खेळीच्या जोरावर मिडलसेक्सने ७ बाद १७४ धावा केल्या. स्टीव्हने ५१ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ६४ धावा केल्या. स्टीव्हशिवाय मिशेलने 36 चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. सरेचा गोलंदाज गुस अ‍ॅटकिन्सनने ३६ धावांत ४ बळी घेतले.

हेही वाचा – मतदान कार्ड बनण्याच्या आधीच शफाली वर्माचा इंग्लंडमध्ये भीमपराक्रम!

सरेकडून ओली पोपने ३५ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच वेळी जेमी ओव्हरटनने १० चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने नाबाद २४ धावा फटकावल्या. दोन्ही संघांदरम्यान एक शानदार सामना खेळला गेला. पण या सामन्यापेक्षा त्या व्यक्तीची असभ्य कृती सर्वांच्या लक्षात राहिली. सोशल मीडियावरही या व्यक्तीला ट्रोल केले जात असून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचीही मागणी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 5:47 pm

Web Title: vitality blast cricket man misbehaved with female spectator in front of everyone adn 96
Next Stories
1 मतदान कार्ड बनण्याच्या आधीच शफाली वर्माचा इंग्लंडमध्ये भीमपराक्रम!
2 रोहितऐवजी मयंक आणि शुबमनला ओपनिंग पाठवले गेले पाहिजे, गावसकरांनी दिला सल्ला
3 भारतीय महिला संघाची विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
Just Now!
X