News Flash

IPL 2020 : स्पर्धेसाठी VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम, गव्हर्निंग काऊन्सिलचा निर्णय

प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून मिळतो ४०० कोटींपेक्षा अधिक महसूल

आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनावर अखेरीस शिक्कामोर्तब झालं आहे. रविवारी गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आला. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. याचसोबत या स्पर्धेसाठी VIVO ही चिनी मोबाईल कंपनीच मुख्य स्पॉन्सर कायम राहणार असल्याचा निर्णय गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठीकीत घेण्यात आला.

अवश्य वाचा – आयपीएलच्या तेराव्या हंगामाला केंद्र सरकारची मान्यता, अंतिम सामना १० नोव्हेंबरला

काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण देशात चीनविरोधात वातावरण तयार झालं होतं. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीमही हाती घेण्यात आली होती. आयपीएलचे मुख्य स्पॉन्सर असलेल्या VIVO कंपनीसोबतचा करारही बीसीसीआयने मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव निर्माण केला जात होता. सुरुवातीला जनमताचा आदर करत बीसीसीआयने यावर विचार करण्याची तयारी दाखवली. परंतू करोनामुळे सध्या निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात सध्याच्या घडीला VIVO कंपनीची स्पॉन्सरशीप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. VIVO आणि बीसीसीआय यांच्यात ५ वर्षांचा करार झाला असून प्रत्येक वर्षासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून ४०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो.

IANS वृत्तसंस्थेशी बोलत असताना बीसीसीआय अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली. “स्पॉन्सरशिप मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. याप्रकरणी आम्ही सर्व तांत्रिक आणि न्यायिक बाजू आम्ही तपासून पाहिल्या. यानंतर कायदेशीर सल्लागारांच्या मताप्रमाणे यंदाच्या हंगामात VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” काही महिन्यांपूर्वी बीसीसीआय अधिकाऱ्यांनी जनमताचा आदर ठेवत पुढील हंगामासाठी बीसीसीय नवीन कंपन्यांना स्पॉन्सरशिप देण्याबद्दल विचार करेल असं आश्वासन दिलं होतं. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना हौतात्म्य स्विकारावं लागलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 9:27 pm

Web Title: vivo to continue as title sponsor amid india china border tensions psd 91
Next Stories
1 गव्हर्निंग काऊन्सिलकडून IPL १३ व्या हंगामाची अधिकृत घोषणा, अंतिम सामना १० नोव्हेंबरला
2 धोनीने भारताकडून अखेरचा सामना खेळला आहे – आशिष नेहरा
3 फोटोतल्या या मुलाला ओळखलंत का?? सध्या भारतीय क्रिकेट संघात आहे महत्वाचा खेळाडू
Just Now!
X