सातत्याने गोल करण्याची संधी शोधण्यासाठी मनातील आवाज ओळखून तो विकसित करणे महत्त्वाचे आहे, तरच यशस्वी आघाडीवीर होता येईल, असे मत भारताचा महान फुटबॉलपटू बायच्युंग भूतियाने व्यक्त केले.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) एका कार्यक्रमादरम्यान भूतिया म्हणाला की, ‘‘गोल करण्याची संधी निर्माण करता येणे, हेच यशस्वी खेळाडूचे लक्षण आहे. त्यासाठी के वळ मनातील आवाज आणि मैदानातील सभोवतालची परिस्थिती ओळखून चाल करणे गरजेचे असते. मनातील आवाज ओळखता येणारेच फुटबॉलपटू जगात यशस्वी होतात.’’ २०११मध्ये निवृत्त झालेल्या भूतियाने १०४ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व करताना ४० गोल केले आहेत.