News Flash

व्होरा, वामन, भोईटे यांना सुवर्णपदक

श्रुती व्होरा (मुंबई उपनगर), क्षितिज भोईटे (ठाणे), श्रद्धा वामन (अहमदनगर) किसन तडवी (नाशिक) या राष्ट्रीय खेळाडूंनी कुमारांच्या राज्य मैदानी स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.

| August 12, 2013 12:29 pm

श्रुती व्होरा (मुंबई उपनगर), क्षितिज भोईटे (ठाणे), श्रद्धा वामन (अहमदनगर) किसन तडवी (नाशिक) या राष्ट्रीय खेळाडूंनी कुमारांच्या राज्य मैदानी स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.
या स्पर्धेत भोईटे याने १६ वर्षांखालील मुलांच्या गटात शंभर मीटर धावण्याची शर्यत ११.१ सेकंदांत जिंकली व वेगवान धावपटूचा मान मिळविला. त्याने दोनशे मीटरची शर्यत जिंकून दुहेरी यश मिळविले. त्याने ही शर्यत २२.९ सेकंदांत पार केली. तडवी याने अपेक्षेप्रमाणे तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळविला. त्याने हे अंतर आठ मिनिटे ४९.८ सेकंदांत पार केले. मुलींच्या १६ वर्षांखालील गटात श्रुती व्होरा हिने थाळीफेकमध्ये (२८.८२ मीटर) सुवर्णपदक मिळविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:29 pm

Web Title: vora vaman bhoite gets gold in state level youth athletics competition
Next Stories
1 मुख्तार अहमद चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा
2 किरमाणीच्या सार्वकालिन सर्वोत्तम कसोटी संघात द्रविड आणि विश्वनाथचा समावेश
3 मँचेस्टरची बाजी
Just Now!
X