ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतो. कुटुंबासोबतचे अनेक फोटो आणि क्षण तो चाहत्यांसाठी पोस्ट करत असतो. यावेळी वॉर्नरनं खुलासा केलाय की, त्याची मुलगी विराट कोहलीची मोठी चाहती आहे. मुलीला त्याच्यापेक्षा विराट कोहलीची बॅटिंग आवडते. वॉर्नरनं पोस्ट केलेला फोटो विराट कोहलीच्या चाहत्यांचं मन जिंकणारा आहे.
वॉर्नरनं मुलगी इंडी हिचा एक फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यानं लिहिलेय की, ‘मला माहित आहे आम्ही मालिका हरलो आहोत. पण माझी मुलगी आनंदात आहे. कारण भेट म्हणून तिला विराट कोहलीची जर्सी मिळाली आहे. धन्यवाद विराट’
Instagram वर ही पोस्ट पहा
आयसीसीनेही हा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे. विराट कोहलीचे चाहते वॉर्नरच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.
Looks like @imVkohli has a new no.1 fan after gifting David Warner’s daughter Indi Rae one of his playing jerseys!
@davidwarner31 pic.twitter.com/12tGFMZjuq
— ICC (@ICC) January 30, 2021
बॉर्डर-गावसकर मालिकेवर भारतीय संघानं लागोपाठ तिसऱ्यांदा वर्चस्व मिळवलं आहे. विराट कोहलीनं आपल्या चाहतीसाठी ऑटोग्राफ केलेली जर्सी भेट म्हणून दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 12:10 pm