02 July 2020

News Flash

U-19 WC : …भारताला दाखवून द्यायचं होतं ! बीभत्स सेलिब्रेशन करणाऱ्या बांगलादेशी गोलंदाजाची कबुली

आम्ही भारताला अंतिम फेरीत हरवण्याची वाट पाहत होतो !

दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशने भारतावर ३ गडी राखून मात करत पहिल्यांदाच १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. मात्र या सामन्यानंतर बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये झालेल्या राड्यामुळे बांगलादेशच्या विजयाला गालबोट लागलं. आयसीसीने या प्रकरणी ३ बांगलादेशी तर २ भारतीय खेळाडूंना Demerit Points (नियमांचा भंग केल्याप्रकरणी सुनावण्यात येणारी शिक्षा) ची शिक्षा सुनावली. या घटनेनंतर बांगलादेशचा गोलंदाज शोरिफुल इस्लामने पहिल्यांदा आपलं मत मांडलं आहे.

भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गनेही बांगलादेशी गोलंदाजांनी विजयानंतर केलेल्या सेलिब्रेशनला किळसवाणं म्हटलं होतं. “याआधी आम्ही भारताविरुद्ध दोन रंगतदार सामने गमावले आहेत. २०१८ साली आशिया चषकातला उपांत्य फेरीचा आणि २०१९ साली आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आम्हाला पराभव सहन करावा लागला. एक खेळाडू म्हणून तो पराभव मी शब्दांत सांगू शकणार नाही. भारतानेही याआधी आम्हाला हरवल्यानंतर अशाच पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं, आम्ही त्यावेळी काही बोलू शकलो नाही. आम्ही फक्त भारताला अंतिम फेरीत हरवण्याची वाट पाहत होते”, इस्लाम Daily Star शी बोलत होता.

सामना जिंकल्यानंतर असं सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं का असा प्रश्न विचारला असता इस्लाम म्हणाला, “हो, आम्हाला संधी होती. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करत विजय मिळवला. भारतालाही कळणं गरजेचं होतं की एखाद्या पराभव झालेल्या संघासमोर सेलिब्रेशन केलं की कसं वाटतं.” अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून फिरकीपटू रवी बिश्नोईने ४ बळी घेत बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडलं, मात्र कर्णधार अकबर अलीने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 2:56 pm

Web Title: wanted to let india know what it feels like shoriful islam on dirty behaviour in u19 world cup final psd 91
Next Stories
1 IPL 2020 : एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण हंगामाचं वेळापत्रक
2 Ind vs NZ : गरज पडल्यास सलामीला येण्यास तयार – हनुमा विहारी
3 IPL 2020 : असं आहे गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं यंदाचं वेळापत्रक…
Just Now!
X