16 January 2021

News Flash

वकार युनूस सनरायझर्सचे गोलंदाजी प्रशिक्षक

महान गोलंदाज वकार युनूस आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद भूषविणार आहेत. वकारने पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षकपद तसेच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले

| March 9, 2013 04:25 am

महान गोलंदाज वकार युनूस आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद भूषविणार आहेत. वकारने पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षकपद तसेच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. टॉम मूडी हे सनरायझर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक असून, कृष्णम्माचारी श्रीकांत या संघाचे सल्लागार आहेत. ८७ कसोटीत युनूस यांच्या नावावर ३७३ विकेट्सची नोंद आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी २६२ सामन्यांत ४१६ विकेट्स मिळवल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघातील डेल स्टेन, इशांत शर्मा, क्लिंट मॅककाय आणि सुदीप त्यागी यांना युनूस यांच्या मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2013 4:25 am

Web Title: waqar to be hyderabads bowling coach in ipl
टॅग Ipl
Next Stories
1 हॅमीश रुदरफोर्डचे पदार्पणात शतक, न्यूझीलंड सुस्थितीत
2 भारताला कडवी झुंज देऊ – क्लार्क
3 आक्रमक फलंदाजी करण्याची आवश्यकता-वेड
Just Now!
X