News Flash

‘ही’ आहे वॉशिंग्टन सुंदर नावामागील कहाणी!

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील नवव्या चेंडूवर विकेट मिळवली

वॉशिंग्टन सातवा सर्वात तरुण भारतीय खेळाडू

बुधवारी मोहालीमधील श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय सामनासब कुछ रोहितप्रकारातला झाला असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. एकदिवसीय समान्यांमध्ये तिसरे द्विशतक साजरे करुन रोहितने आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाची खास भेट दिली. मात्र हा सामना भारतीय संघातील इतर दोन खेळाडूंसाठीही खास होता, ते म्हणजे श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर. श्रेयसने दमदार खेळी केली, मात्र त्याचे शतक थोडक्यात हुकले. तर १८व्या वर्षी भारतीय संघाची निळी टोपी मिळवणारा वॉशिंग्टन सातवा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. वॉशिंग्टनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील नवव्या चेंडूवर विकेट मिळवत आपल्या कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा केला. सामन्याच्या सोळाव्या आणि आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टनने थिरिमानेचा त्रिफळा उडवला. इतक्या कमी वयात पदार्पण करुन पहिल्याच सामन्यात विकेट मिळवण्याची किमया वॉशिंग्टनने साधली मात्र त्याच्या नावाबद्दलचे कुतूह आजही अनेकांना आहे. त्याचे नावं वॉशिग्टन का ठेवण्यात आले याबद्दलचा किस्सा त्याच्या वडिलांनीच हिंदूया वृत्तपत्राला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये सांगितला होता.

भारतीय असूनही इंग्रजी व्यक्तीप्रमाणे मुलाला दिलेल्या नावाबद्दल सुंदर म्हणाले की, मी हिंदू असून, आमचे कुटुंब अगदी साधे आहे. ट्रिप्लिकेनमध्ये (आत्ताचे थिरुवल्लीकेनी) आमच्या घरापासून दोन गल्ल्या सोडून सैन्यातून निवृत्त झालेले पी. डी. वॉशिंग्टन नावाचे एक गृहस्थ राहत होते. ते क्रिकेटचे मोठे चाहते होते. आम्ही क्रिकेट खेळायला जायचो तेव्हा ते मरिना मैदानावर आमचा खेळ पाहण्यासाठी यायचे. ते स्वत: एक उत्तम क्रिकेटपटू होते. आमच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. म्हणून माझ्या खेळाच्या प्रेमात पडलेल्या या गृहस्थांनी मला शाळेचा गणवेश घेऊन दिला, माझ्या शाळेची फी भरली तसेच पुस्तके दिल्याच्या आठवणी सुंदर यांनी या मुलाखतीमध्ये सांगितल्या. केवळ आर्थिक मदत नाही तर वॉशिंग्टन हे मला सायकलीवरुन मैदानावर घेऊन जायचे. तसेच सतत मला प्रेरणा देत राहायचे असेही सुंदर यांनी सांगितले. सुंदर यांनी रणजी संघात स्थान मिळवल्यानंतर वॉशिंग्टन खूप खूश झाले होते. त्यांना आपल्यामुळे आंनद झाल्याचे पाहून मला बरे वाटायचे. कारण त्यांनी माझ्यासाठी बरेच कष्ट घेतलेले आणि त्यामुळेच ते माझ्यासाठी खूप काही होते. मात्र दुर्देवाने माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वीच त्यांचे निधन झाले. माझ्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी अनेक वैद्यकीय अडचणी आल्या. मात्र माझा मुलगा वाचला. आमच्याकडील प्रथेप्रमाणे त्याच्या नामकरणाच्या वेळी मी बाळाच्या कानात श्रीनिवास हे नाव बोललो आणि त्याचे नाव श्रीनिवास ठेवले. मात्र मी आधीपासून ठरवलेले त्याप्रमाणे माझ्या पहिल्या मुलाला मी वॉशिंग्टन यांचे नाव दिले. माझ्यासाठी इतकं काही करणारी व्यक्ती कायम लक्षात राहावी म्हणून मी माझ्या मुलाचे नाव वॉशिंग्टन ठेवले. मला दुसरा मुलगा झाला असता तर मी त्यालाही वॉशिंग्टन ज्युनियर नावानेच हाक मारली असती असंही, ते या मुलाखतीच्या शेवटी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 1:25 pm

Web Title: washington sundar got his first name from an ex army officer who lived near his home
Next Stories
1 ‘हिटमॅन’ची माणुसकी; श्रीलंकन चाहत्याला केली मदत
2 Ind vs SL 2nd ODI Stats: मोहालीच्या मैदानात घडले ‘हे’ दहा विक्रम
3 नेमबाज पूजा घाटकरशी ‘व्हिवा लाऊंज’मध्ये गप्पा
Just Now!
X