पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने ५७८ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली, पण ऋषभ पंत- चेतेश्वर पुजारा जोडीने डाव सावरला. त्यांच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर-अश्विन जोडीनेही डावाला स्थैर्य दिले. चौथ्या दिवसाच्या खेळात वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक ठोकत एक पराक्रम केला.
Video: अजब गजब विकेट… पुजारा कसा बाद झाला पाहिलंत का?
रोहित शर्मा (६), शुबमन गिल (२९), विराट कोहली (११) आणि अजिंक्य रहाणे (१) हे चौघे स्वस्तात बाद झाले. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली. चेतेश्वर पुजाराने ७३ तर ऋषभ पंतने ९१ धावांची खेळी केली. त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन जोडीने डाव पुढे नेला. वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियातील आपली लय कायम राखत या सामन्यातही अर्धशतक ठोकले. आपल्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या दोनही सामन्यात अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम त्याने केला. तसेच, परदेशीताली कसोटी पदार्पणात आणि मायदेशातील कसोटी पदार्पणात असे दोन्ही सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजाला बहुमानही त्याने मिळवला.
Washington Sundar scores his second Test fifty in only his second Test
His seventh-wicket stand with R Ashwin has crossed the 50-run mark!#INDvENG https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/UBPAM2IW9Q
— ICC (@ICC) February 8, 2021
IND vs ENG व्वा पंत… जिंकलंस!! मैदानात असूनही त्याने केलं असं काही की…
दरम्यान, त्याआधी इंग्लंडचा डाव सर्वबाद ५७८ वर आटोपला. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक हे डावातील विशेष आकर्षण ठरले. त्याला आधी डॉम सिबली आणि बेन स्टोक्स यांच्या अर्धशतकी खेळींची साथ मिळाली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी थोडीफार फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2021 10:52 am