भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि सध्या विदर्भाकडून खेळणाऱ्या वासिम जाफरने, आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. सोमवारपासून बीसीसीआयच्या मानाच्या रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. गतविजेता विदर्भाचा संघ आपला पहिला सामना आंध्र प्रदेशविरुद्ध खेळतोय. अनुभवी वासिम जाफरचा हा रणजी क्रिकेटमधला १५० वा सामना ठरला आहे. अशी कामगिरी करणारा वासिम जाफर पहिला खेळाडू ठरला आहे.

मैदानावर पाऊल ठेवताच विदर्भाच्या सर्व खेळाडूंनी वासिम जाफरचं अभिनंदन केलं. वासिमने मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. गेली ३ वर्ष तो विदर्भाकडून खेळतो आहे. आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला रणजी क्रिकेटमध्ये वासिम जाफरसारखी कामगिरी करता आलेली नाहीये. दरम्यान विदर्भाचा कर्णधार फैज फजलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अवश्य वाचा – Video : ….आणि चक्क सापामुळे थांबवावा लागला क्रिकेटचा सामना