24 January 2021

News Flash

वासिम जाफरचा रणजी क्रिकेटमध्ये विक्रम; 11 हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू

बडोद्याविरुद्ध सामन्यात केला विक्रम

वासिम जाफर (संग्रहीत छायाचित्र)

मुळचा मुंबईचा मात्र सध्या विदर्भाकडून रणजी क्रिकेट खेळणाऱ्या वासिम जाफरने रणजी क्रिकेटमध्ये आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. रणजी क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा गाठणारा वासिम पहिला फलंदाज ठरला आहे. बडोद्याविरुद्ध सामन्यामध्ये वासिमने ही कामगिरी केली. नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना सुरु आहे.

वासिम जाफरने विदर्भाचा कर्णधार फैज फजलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 300 धावांची भागीदारी रचली. फजल माघारी परतल्यानंतर वासिमने हा अनोखा विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे. याचसोबत वासिमने आपला जुना मुंबईकर सहकारी अमोल मुझुमदारचा विक्रमही मोडला आहे. वासिमने पहिल्या डावात 153 धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक – विदर्भ पहिला डाव 529/6 डाव घोषित. वासिम जाफर 153, फैज फजल 151, अक्षय वाडकर नाबाद 102. लुकमन मेरीवाला 2/79

विरुद्ध बडोदा, केदार देवधर, आदित्य वाघमोडे दोन्ही फलंदाज नाबाद 20

दुसऱ्या दिवसाअखेरीस बडोदा 41/0

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2018 8:46 pm

Web Title: wasim jaffer breaches 11000 runs mark in ranji trophy
Next Stories
1 Ind vs Aus : ऋषभ पंतची विकेट सामन्याचा निर्णायक क्षण – विराट
2 Mens Hockey World Cup 2018 : बेल्जियमचा अपवाद वगळता भारताला साखळी फेरीत सोपा पेपर
3 IND vs AUS : कृणालच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम
Just Now!
X