02 March 2021

News Flash

वयाच्या चाळीशीत वासिम जाफरचा नवा विक्रम, आशियामधला ठरला पहिला फलंदाज

वयाची पसतीशी ओलांडल्यानंतर क्रिकेटपटूंचा खेळ मंदावतो. पण मुंबईकर वासिम जाफर मात्र याला अपवाद ठरला आहे.

वासिम जाफर

वयाची पसतीशी ओलांडल्यानंतर क्रिकेटपटूंचा खेळ मंदावतो. पण मुंबईकर वासिम जाफर मात्र याला अपवाद ठरला आहे. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही वासिम जाफरचा खेळ अधिकाधिक बहरत चालला आहे. सध्या चालू असलेल्या रणजी हंगामात विदर्भाकडून खेळणाऱ्या वासिम जाफरच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे.

गुरुवारी रणजी करंडक स्पर्धेत उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वासिम जाफरने द्विशतक झळकवताना एक विक्रम रचला. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन द्विशतक झळकवणारा वासिम जाफर पहिला भारतीय आणि पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे.

वासिम जाफरने २९६ चेंडूत २०६ धावा केल्या तसेच संजय रामासामीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३०४ धावांची भागीदारी केली. जाफरच्या द्विशतकी खेळीमुळे विदर्भाला पहिल्या डावात उत्तराखंडवर महत्वाची आघाडी मिळवता आली. उत्तराखंडचा पहिला ३५५ धावांवर संपुष्टात आला. तिसऱ्या दिवसअखेर विदर्भाकडे २०४ धावांची आघाडी असून अजून चार फलंदाज शिल्लक आहेत.

वयाच्या चाळीशीत पदार्पण केल्यानंतर जाफरने २०१७-१८ मध्ये नागपूर येथेच शेष भारताविरुद्ध खेळताना २८६ धावांची खेळी करताना पहिले द्विशतक झळकावले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरच्या नावावर आत नऊ द्विशतकांची नोंद झाली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकांचीही जाफरच्या नावावर नोंद आहे. विदर्भाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या जाफरने या मोसमात नऊ सामन्यांमध्ये चार शतके, दोन अर्धशतकांसह ९६९ धावा केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 6:46 pm

Web Title: wasim jaffer creates asian record with double century in ranji trophy
Next Stories
1 माणसांकडून चुका होतातच, राहुल-पांड्याची गांगुलीकडून पाठराखण
2 धोनी अखेरपर्यंत खेळून विजय मिळवून देईल – सचिन
3 पांड्या, राहुलची संघवापसी लांबली; सुप्रीम कोर्टात सुनावणी स्थगित
Just Now!
X