मूळचा मुंबईचा असलेला प्रतिभावंत फलंदाज वसिम जाफर हा भारतीय क्रिकेटमधील रनमशीन. जाफरने भारतीय क्रिकेट अत्यंत जवळून पाहिलं आणि अनुभवलं. काही कारणांमुळे जाफरला भारतीय संघात स्थान मिळवणं आणि टिकवून ठेवणं अवघड गेलं. पण रणजी सामन्यांचा मास्टर खेळाडू म्हणून तो ओळखला जातो. नुकताच वसिम जाफरने त्याच्या पसंतीचा सर्वकालीन सर्वोत्तम भारतीय खेळाडूंचा एक वन डे संघ जाहीर केला.

वसिम जाफरने जाहीर केलेल्या संघात त्याने सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीला सलामीवीर म्हणून निवडले. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि युवराज सिंग यांना मधल्या फळीत स्थान दिले. यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून त्याने महेंद्रसिंग धोनीची निवड केली. तर अष्टपैलू खेळाडूंसाठी त्याने कपिल देव आणि रविंद्र जाडेजा / हरभजन सिंग यांना पसंती दर्शवली. गोलंदाजांच्या ताफ्यात त्याने अनिल कुंबळे, जहीर खान आणि जसप्रीत बुमराह यांना स्थान दिले. त्याने स्वत: निवडलेला संघ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. या ट्विटवर भारताचा फिरकीपटू याने वसिम जाफरला संघातून सेहवागला वगळ्याबद्दल सवाल केला.

त्यावर जाफरने छान उत्तर दिले. तो म्हणाला की सेहवागला संघात घेण्यासाठी तू कोणाला संघातून बाहेर करशील… सचिन, गांगुली की रोहित? तूच मला सांग.

दरम्यान, जाफरला भारतीय संघातून फारशी चमक दाखवला आली नाही, पण जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत तब्बल २६० सामने खेळत जाफरने १९ हजार ४१० धावा केल्या. यामध्ये ५७ शतके आणि ९१ अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे १५० रणजी सामने खेळणारा वसीम जाफर हा पहिला खेळाडू आहे. त्याच त्याच्या नावावर १२ हजारांपेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम आहे.