सध्या जगभरात करोना विषाणूचा फैलाव झपाट्याने सुरू आहे. प्रत्येक देश करोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करत आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्व क्रिकेटपटू घरीच आहेत. काही क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर टिकटॉक व्हिडीओ बनवण्यात आघाडीवर आहे. त्यातच त्याचा सहकारी अरॉन फिंच यानेही एक नवा टिकटॉक व्हिडीओ बनवला आहे.

‘विराट म्हणजे…’; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

फिंचने बनवलेला नवा व्हिडीओ अतिशय मजेशीर आहे. फिंचच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये फिंच एका गाण्याच्या तालावर डान्स करताना दिसतो आहे. तो डान्स करताना त्याचा कुत्रा इवी यादेखील त्याच्यासमोरच बसला आहे. पण जेव्हा फिंच नाचायला लागतो, तेव्हा फिंचचा डान्स पाहून तो कुत्रादेखील तेथून निघून जातो, अशाप्रकारचा व्हिडीओ फिंचने पोस्ट केला आहे. तो व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर करताना त्याने त्या व्हिडीओला झकास कॅप्शनदेखील दिले आहे. ‘इवीसोबत माझा नवा खेळ’ असे त्याने लिहिले असून व्हिडीओमध्येही त्याने टेक्स्ट वापरले आहेत. त्यात ‘माझा टिकटॉक डान्स कुत्र्यालाही पसंत नाही’ अशा आशयाचा संदेश त्याने लिहिला आहे.

हा पाहा भन्नाट व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

New game with Evie #quarantinelife

A post shared by Aaron Finch (@aaronfinch5) on

या आधी फिंचने आणखी एक व्हिडीओदेखील बनवला होता. एका म्युझिकवर फिंच डान्स करत होता. पण डान्स सुरू असतानाच मागून आवाज आला, “नको… कृपया डान्स थांबवा..” फिंचने डान्स थांबवला आणि पुन्हा नाचायला सुरुवात केली. त्यावेळी पुन्हा तसाच आवाज आला. ते ऐकून अखेर फिंच फ्रेम मधून निघून गेला. हा व्हिडीओ फिंचने इन्स्टाग्रामवर शेअर केला. (व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा) “मी ३० वर्षावरील आहे आणि टिकटॉक वर डान्स करण्याचा प्रयत्न करतोय. (पण मला ते जमत नाहीये) त्यामुळे बहुतेक मी क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करेन”, असे त्याने मजेशीर कॅप्शन दिले होते.