News Flash

VIDEO: अहमद शेहजाद हुबेहूब धोनीचा हेलिकॉप्टर शॉट लगावतो तेव्हा..

महेंद्रसिंग धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसारखा हुबेहूब फटका मारून षटकार ठोकला

अंतिम सामन्यात शेहजादने सर्वोत्तम १६६ धावांची खेळी साकारली.

पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज अहमद शेहजाद सध्या करिअरच्या कठीण काळात आहे. आश्वासक फलंदाजी आणि सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची कुवत असतानाही संघात जागा मिळविण्यासाठी अहमद शेहजाद सध्या धडपडत आहे. सध्याचे पाकिस्तानचे निवड समितीचे अध्यक्ष इंजमाम उल हक आणि इतर सदस्य शेहजादच्या बाजूने नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघात शेहजादचे पुनरागमन होणे कठीण असल्याचे म्हटले जाते. पण शेहजाद स्थानिक क्रिकेट सामन्यांत दमदार कामगिरीने संघातील पुनरागमनाचे दार उघडण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहे.

हबीब बँक संघाकडून खेळताना पाकिस्तानातील फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शेहजादने ६९९ धावा कुटल्या. यात चार शतकांचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे, तर अंतिम सामन्यात त्याने सर्वोत्तम १६६ धावांची खेळी साकारली. शेहजादने एका सामन्यात भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसारखा हुबेहूब फटका मारून षटकार ठोकला. शेहजादच्या या फटक्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. शेहजादने या सामन्यात शतक ठोकले होते. अहमद शेहजाद याने नुकतेच भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर टीका केली होती. त्यानंतर ट्विटरकरांनी शेहजाद याला चांगलेच धारेवर धरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2017 7:13 pm

Web Title: watch ahmed shehzad perfectly replicates ms dhoni helicopter shot
Next Stories
1 VIDEO: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा विक्रमी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर
2 वैयक्तिक लढाई नाही, ‘बीसीसीआय’च्या स्वायत्ततेसाठी आजवर लढा दिला- अनुराग ठाकूर
3 ‘बीसीसीआय’ची प्रतिमा ढासळू नये हीच आशा- अजय शिर्के
Just Now!
X