News Flash

विश्वास ठेवा, ही बातमी खरी आहे! फलंदाज मोहीत जांगरा, झेलबाद मंकड; गोलंदाज चेतेश्वर पुजारा

उत्तर प्रदेशविरुद्ध सामन्यात केली अनोखी कामगिरी

क्रिकेटमध्ये काही गोष्टी कधीकधी अनाकलनियरित्या घडतात. चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य हिस्सा आहे. गेली काही वर्ष पुजाराने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने कसोटी संघातलं आपलं तिसरं स्थान पक्क केलं आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत पुजारा मैदानात खोऱ्याने धावा काढतो. मात्र रणजी क्रिकेट स्पर्धेत पुजाराने एक अविश्वसनीय गोष्ट करुन दाखवली आहे.

सौराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश रणजी सामन्यात, चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात गोलंदाजी करुन सर्वांना धक्का दिला. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पुजाराने उत्तर प्रदेशच्या मोहीत जांगरा या खेळाडूला माघारी धाडलं. पुजाराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

The day when I changed my Batsman status to an All-rounder

A post shared by Cheteshwar Pujara (@cheteshwar_pujara) on

पुजाराने या सामन्यात संमिश्र खेळ. पहिल्या डावात त्याने ५७ धावा केल्या, मात्र दुसऱ्या डावात तो अवघ्या ३ धावा काढून माघारी परतला. पहिल्या डावात आश्वासक फलंदाजी केल्यानंतर सौराष्ट्राचा दुसरा डाव कोलमडला. उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत सौराष्ट्राला १२० धावांत गारद करत एक डाव आणि ७२ धावांनी विजय मिळवत ७ गुणांची कमाई केली.

अवश्य वाचा – श्रेयस अय्यर-शिवम दुबे अडचणीत?? रेल्वेविरुद्ध रणजी सामना न खेळल्यामुळे MCA नाराज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 3:28 pm

Web Title: watch cheteshwar pujara takes a wicket of his second ball in ranji trophy psd 91
Next Stories
1 श्रेयस अय्यर-शिवम दुबे अडचणीत?? रेल्वेविरुद्ध रणजी सामना न खेळल्यामुळे MCA नाराज
2 IPL 2020 : …म्हणून मी दिल्लीकडून खेळण्याचा निर्णय घेतला – अजिंक्य रहाणे
3 दानिश कनेरिया पैशांसाठी काहीही बोलू शकतो – जावेद मियाँदाद
Just Now!
X