31 May 2020

News Flash

Video : स्टेडियममध्ये ‘मोदी मोदी…’चा जयघोष अन् CAA ला विरोध करणारे बसले गप्प

सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी CAA ला विरोध करणाऱ्यांना खाली बसवलं..

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरॉन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत भारतावर १० गडी राखून मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वॉर्नरने या सामन्यात नाबाद १२८ तर फिंचने नाबाद ११० धावा केल्या.

BLOG : टीम इंडिया… वेळीच सावरा!

या सामन्यादरम्यान मैदानावर एक विचित्र प्रकार दिसून आला. देशभरात CAA आणि NRC वरुन सुरु असलेल्या निदर्शनांची झळ या सामन्यालाही बसलेली पहायला मिळाली. मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी आपल्या टी-शर्टवर NO CAA – NO NRC असं लिहून केंद्र सरकारच्या कायद्याला विरोध दर्शवला.

IND vs AUS : ‘हिटमॅन’ स्वस्तात बाद; तरीही मोडला सचिन, विराटचा विक्रम

पण महत्त्वाचे म्हणजे जसे या कायद्याला विरोध करणारे तरूण आहेत, तसेच त्या कायद्याच्या समर्थनार्थ आवाज देणारेही लोक आहेत. त्याताच प्रत्यय स्टेडीयममध्ये दिसून आला. तरूणांनी NO CAA – NO NRC अशा घोषणा देताच त्यांच्या मागच्या बाजूने मोठ्या जमावाने ‘मोदी मोदी…’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर NO NRC – NO CAA अशा घोषणा देणाऱ्या तरूणांना खाली बसावे लागले.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा डाव २५५ धावांवर आटोपला. शिखर धवनने सर्वाधिक ७४ धावा ठोकल्या. २५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात आक्रमक केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. अर्धशतकी भागीदारीचं दोन्ही फलंदाजांनी शतकी भागीदारीत रुपांतर केलं. भारताचा एकही गोलंदाज ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना माघारी धाडू शकला नाही. अखेर एकही गडी न गमावता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी २५६ धावांचे लक्ष पार केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 11:53 am

Web Title: watch cricket fans raised slogans in support of pm narendra modi caa nrc at wankhede stadium mumbai in india vs australia 1st odi video vjb 91
Next Stories
1 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची पदकांची शंभरी पार
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : अनिर्णीत सामन्यात मुंबईला तीन गुण
3 होबार्ट खुली टेनिस स्पर्धा : सानियाचे यशस्वी पुनरागमन
Just Now!
X