26 September 2020

News Flash

Video : डेव्हिड मिलर की सुपरमॅन? कर्णधार विराट कोहलीही झाला अवाक

सीमारेषेवर मिलरने उडी मारत एकहाती झेल घेत शिखरला माघारी धाडलं

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी दिलेलं १५० धावांचं लक्ष्य भारताने विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं. रोहित शर्मा झटपट माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने शिखर धवनच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी रचत भारतीय डावाला आकार दिला. १२ व्या षटकात तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर शिखर धवनने पुढे येत चौकार ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमारेषेवर डेव्हिड मिलरने सुपरमॅनलाही लाजवेल अशी उडी घेत एकहाती झेल घेत शिखरला माघारी धाडलं. मिलरचा हा झेल पाहून कर्णधार विराट कोहलीही चांगलाच अवाक झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

शिखर धवन ४० धावांवर शम्सीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर ऋषभ पंतही अवघ्या ४ धावा काढून माघारी परतला. यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरला साथीला घेत आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेकडून फेलुक्वायो, शम्सी आणि फॉर्च्युन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 12:48 pm

Web Title: watch david millers one handed blinder leaves virat kohli stunned psd 91
Next Stories
1 आफ्रिकेविरुद्ध मालिकेत नवीन खेळाडूंना संधी मिळणार – विराट कोहली
2 Video : मोहालीच्या मैदानावर विराट कोहलीचा रुद्रावतार
3 आफ्रिदीला मागे टाकत विराटची दुसऱ्या स्थानावर मुसंडी, आफ्रिदीनेही केलं कौतुक
Just Now!
X