News Flash

Video : ‘लॉकडाउन’मध्ये वॉर्नरचा अजब गजब ‘वर्कआऊट’

वॉर्नरची लेकही त्याला साथ देताना दिसते...

सध्या करोनामुळे क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू घरी आहेत. घरबसल्या क्रिकेटपटू वेगवेगळ्या प्रकारे आपला वेळ घालवत आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर टिकटॉकवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असल्याचे दिसत आहे. तो गेले काही दिवस सातत्याने टिक टॉकवर व्हिडीओ बनवत असून ते व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. आज वॉर्नरने एक अजब-गजब वर्कआउटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

“माझी बायको क्रिकेट बघताना मला ‘हे’ प्रश्न विचारते”; रैनाने सांगितला धमाल अनुभव

वॉर्नरने सर्वप्रथम शीला की जवानी गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर त्याने सहकुटुंब एका म्यूझीकवर डान्स केला होता. त्यानंतर त्याने अल्लू अर्जूनच्या गाण्यावर डान्स केला. हे सारे टिकटॉक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यानंतर वॉर्नरने आणखी व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये वॉर्नरने आपली पत्नी कँडी आणि मुलगी यांच्यासोबत विरासत या हिंदी चित्रपटातील एका गाण्याच्या म्यूझीकवर डान्स केला. त्याने त्या व्हिडीओमध्ये केवळ हातवाऱ्यांच्या सहाय्याने डान्स केला असून तिघांनीही एकत्रितपणे सारखे हावभाव केल्याने व्हिडीओत धमाल आली. चाहत्यांचाही यास चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय त्याने एका व्हिडीओत चहाचा घोट घेत विचित्र हावभाव करतानाचा व्हिडीओही पोस्ट केला होता.

त्यांचे काही वेगळेच खेळ सुरू होते – हरभजन

त्यानंतर आता वॉर्नरने एक खास वर्कआउट व्हिडीओ टाकला आहे. या व्हिडीओमध्ये तो हिरव्या रंगाचा सँडो आणि गुलाबी लालसर रंगाची पॅन्ट घालून व्हिडीओ करत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला व्हिडीओमध्ये त्याच्या आजुबाजुला एक मोठी साखळीदेखील दिसत आहे. पण नंतर साखळी निघून जाते आणि मग आपल्या मुलीसोबत वेगवेगळे व्यायामप्रकार वॉर्नर करताना दिसतो. त्या व्हिडीओवर त्याने कॅप्शन लिहिले आहे की हा माझा गुरूवारचा वर्कआउट आहे. तुम्ही यापेक्षा चांगला वर्कआउट करून दाखवा. या व्हिडीओला सध्या खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

धोनी नव्हे, ‘हा’ खेळाडू पुन्हा टीम इंडियात हवा; रोहितने व्यक्त केली इच्छा

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

Workout Thursday!! Beat this one everybody! #family #alwaystraining

A post shared by David Warner (@davidwarner31) on

दरम्यान, याआधी वॉर्नरने एका शर्यतीचा मनोरंजक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये वॉर्नर, त्याची पत्नी आणि दोन मुली एक शर्यत खेळत होते. तिघांच्या हातात कारच्या स्टेअरिंग व्हीलप्रमाणे डब्ब्यांची झाकणं आहेत, तर एक मुलगी थेट लोळत शर्यतीत सहभागी झाली होती. या शर्यतीत कोण जिंकलं? असा प्रश्न वॉर्नरने चाहत्यांना विचारला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 3:28 pm

Web Title: watch david warner shares tik tok video thursday workout challenge other to beat it vjb 91
Next Stories
1 शिखरला पहिला चेंडू खेळायचा नसतो, रोहितच्या आरोपांवर ‘गब्बर’ म्हणतो…
2 “माझी बायको क्रिकेट बघताना मला ‘हे’ प्रश्न विचारते”; रैनाने सांगितला धमाल अनुभव
3 ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबीराचं आयोजन करण्याचा BCCI चा विचार
Just Now!
X