अनेक सेलिब्रिटी खेळाडू ज्याप्रमाणे मैदानावरील कामगिरीमुळे चर्चेत असतात, त्याचप्रमाणे मैदानाबाहेरील त्यांच्या कारवायांमुळे देखील चर्चेचा विषय बनतात. अर्जेंटिनाचा विश्वविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना अशा खेळाडूंपैकी एक आहे. अर्जेंटिनाच्या या विश्वविख्यात फुटबॉलपटूचे मैदानाबाहेरील गैरवर्तनाचे किस्से प्रसिद्ध आहेत. पत्रकाराला मारहाण करणे अथवा अर्जेंटिनाच्या फुटबॉल प्रमुखांना मधले बोट दर्शवून त्यांचा अपमान करण्यासारख्या गैरवर्तनामुळे सतत चर्चेत राहिलेला दिएगो मॅराडोना आपली २४ वर्षीय गर्लफ्रेण्ड रोसिओ ऑलिवा मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमधील दृष्यात मद्यधुंद अवस्थेतील मॅराडोना रोसिओ ऑलिवाच्या दिशेने लडखडत चालत येऊन, तिला मारहाण करताना नजरेस पडतो. मॅराडोना मारहाण करत असताना त्याच्या गर्लफ्रेण्डने गुपचूपपणे हे दृष्य कॅमेराबद्ध केले.


(व्हिडिओ  – वॉच नाऊ)