30 May 2020

News Flash

Video : ….आणि कृणाल पांड्याचं डोकं फुटता फुटता वाचलं

हार्दिकसोबत सरावादरम्यान घडला प्रसंग

वेस्ट इंडिज दौऱ्यात बाजी मारल्यानंतर भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. १५ सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. विंडीज दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या संघालाच निवड समितीने आफ्रिकेविरुद्ध मालिकेत संधी दिली आहे. हार्दिक पांड्याने आफ्रिकेविरुद्ध टी-२० संघात पुनरागमन केलं आहे. कृणाल पांड्यालाही या संघात स्थान मिळालं आहे.

आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी दोन्ही पांड्या बंधू सध्या सराव करत आहेत. या सरावादरम्यान हार्दिक पांड्याने कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर उंच फटके खेळण्याचा सराव केला. यादरम्यान हार्दिकचा एक फटका कृणालच्या डोक्याला लागता लागता राहिला. या सरावाचा छोटासा व्हिडीओ हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, आणि आपल्या भावाची माफीही मागितली आहे.

आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा आहे भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2019 2:05 pm

Web Title: watch hardik pandya apologises for almost knocking krunal head off in practice session psd 91
Next Stories
1 स्टीव्ह स्मिथ ठरतोय विराट कोहलीसाठी डोकेदुखी, कारण…
2 भारतावर आरोप करणाऱ्या पाकिस्तानला श्रीलंकेचे सणसणीत उत्तर
3 ‘गेल’ वादळ थांबता थांबेना! टी २० मध्ये केलं विक्रमी शतक
Just Now!
X